नवी दिल्ली
मोटोरोला कंपनीने आपला नवा मोटो जी-52 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. जी सेगमेंटमध्ये दाखल झालेला हा फोन वजनाने हलका असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या स्मार्टफोनला 50 मेगापिक्सलचा ट्रीपल कॅमेरा असून 5000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीची जोड देण्यात आली आहे. 4 जीबी आणि 128 जीबी स्टोअरेजच्या स्मार्टफोनची किंमत 14449 रुपये तर 6 जीबी आणि 128 जीबी स्टोअरेजच्या स्मार्टफोनची किंमत 16499 रुपये इतकी असणार आहे. सदरचा स्मार्टफोन 3 मे दुपारी 12 नंतर फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. एचडीएफसी बँक कार्ड असणाऱयांना एक हजार रुपयाची सवलत मिळणार आहे. 6.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले फोनला असणार असून अड्रीनो 610 जीपीयु प्रोसेसरची जोड याला असेल.