Tarun Bharat

मोटोरोलाचा ‘मोटो इ13’ स्मार्टफोन बाजारात दाखल

प्रतिनिधी/ नवी दिल्ली

मोटोरोलाने आपला स्वस्त स्मार्टफोन ‘मोटो इ13’ भारतीय बाजारात सादर केला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 6,999 रुपये इतकी राहणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच आकाराचा एलसीडी डिस्प्ले व दीर्घकालावधीपर्यंत चालणारी 5,000 एमएएच क्षमतेची बॅटरीही मिळणार असल्याची माहिती आहे. सदरचा स्मार्टफोन हा विक्रीसाठी 15 फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

दोन मॉडेलमध्ये होणार उपलब्ध

मोटोरोलाचा स्मार्टफोन हा दोन प्रकारात सादर करण्यात येणार आहे. यात 2 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज व 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजसहचा मिळणार आहे. यासोबतच 4 जीबी रॅमची किंमत 7,999 इतकी रक्कम राहणार आहे.

Related Stories

शाओमी ‘एमआय 11 अल्ट्रा’ला होणार विलंब

Patil_p

मोटो जी 71 येणार 10 जानेवारीला

Patil_p

‘वन प्लस’ची भारतीय बाजारावर नजर

Patil_p

आता नोएडामध्येही ऍपल आयफोनचे उत्पादन

Patil_p

स्मार्टफोन्सच्या विक्रीत 10 टक्के वाढीची आशा

Patil_p

मोठय़ा डिस्प्लेसोबत नोकियाचे फोन बाजारात

Patil_p