पंतप्रधान मोदींच्या धोरणांनी प्रभावित
वृत्तसंस्था/ चेन्नई
कार अन् बाइक रेसिंग चॅम्पियन अलीशा अब्दुल्लाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांनी प्रभावित होत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अलीशाने तामिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन अलीशा या पंतप्रधान मोदींच्या धोरणांनी प्रभावित होत भाजपमध्ये दाखल झाल्याचे अन्नामलाई यांनी म्हटले आहे. अलीशा यांच्या भाजपप्रवेशाचे छायाचित्र अन्नामलाई यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. भाजपमध्ये सामील झाल्यावर अलीशाने महिलांच्या कल्याणासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. अलीशा अब्दुल्ला ही भारतीय रेसिंग ड्रायव्हर आहे. 33 वर्षीय अलीशाने रेसिंगच्या क्षेत्रात 9 विजेतेपदे मिळविली आहेत.