अभिनेत्री उर्वशी रौतेलाने 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. आता उर्वशी स्वतःचा नवा चित्रपट ‘दिल है ग्रे’मधून पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मुक्काबा’मधील अभिनेता विनीत कुमार सिंह आणि अक्षय ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर सादर करण्यात आले आहे.
उर्वशी आणि विनीत यांच्या दिल है ग्रेचे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले असून यात विनीत पोलीस अधिकाऱयाच्या स्वरुपात दिसून येत आहे. हे पोस्टर उर्वशीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. क्राइम ड्रामा स्वरुपाच्या या चित्रपटाची कथा एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱयाच्या भोवती घुटमळणारी आहे.
चित्रपटाच्या कहाणीने माझे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटाचा विषय अत्यंत रंजक असल्याचे उर्वशीने म्हटले आहे. हा एक उत्सुकता निर्माण करणारा चित्रपट असल्याची प्रतिक्रिया विनीतने व्यक्त केली आहे. हा चित्रपट जुलै महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुशी गणेशन यांनी केले आहे. तर सूरज प्रॉडक्शन अंतर्गत याची निर्मिती करण्यात आली आहे.