Tarun Bharat

महापुरातील शेतकर्‍यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नये

खासदार धैर्यशील माने यांचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री व सहकार मंत्र्यांना पत्र

इचलकरंजी: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून पुरबाधित शेतकर्‍यांना वचित ठेवू नका अशी मागणी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी दिले आहे.

राज्यामध्ये जुलै,ऑगस्ट 2019 या काळात अतिवृष्टीमुळे महापूर आला, यामध्ये सर्वाधिक नुकसान कोल्हापूर व सांगली जिल्हयातील शेतकर्‍यांचे झालेले आहे. यासह सातारा, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, नगर, अमरावती, नागपूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, जळगाव. नंदुरबार या जिल्ह्यानाही महापुराचा फटका बसला होता. यावेळी येथील शेतकर्‍यांना एक हेक्टरपर्यंत पिककर्ज व 31 ऑगस्ट 2019 पर्यंतचे व्याज माफ केले होते. मात्रा आताच्या कर्जमाफीच्या यादीतून या शेतकर्‍यांना वगळले आहे. 2019 नंतरही येथील शेतकर्‍यांना महापुराचा सामना करावा लागला आहे. सुधारीत आदेशात सदर शेतकर्‍यांना दुबार लाभ देणे उचित होणार नाही. मयत असलेल्या शेतकर्‍यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करु नये असे स्पष्ट केल्याने हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. या निर्णयामुळे त्या शेतकर्‍यांवर अन्याय होणार आहे. तरी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासह इतर सर्वच जिल्ह्यातील प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहणार्‍या प्रामाणिकपणे कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना नियम व अटी रद्द करुन प्रोत्साहनपर अनुदान देणेबाबत त्वरीत निर्णय घ्यावा असे खासदार माने यांनी पत्रात म्हटले आहे.

शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे निकष लावत असताना प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड शेतकर्‍यांनी केलेली आहे. त्यानुसार सर्व प्रामाणिकपणे कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणे आवश्यक असून त्यासंदर्भात पूर नुकसान भरपाईचा निकष लावणे योग्य होणार नाही. कारण सलग दोन वेळा आलेला महापूरामुळे पूरग्रस्त भागातील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणी आलेला आहे. तसेच एखादा शेतकरी कर्जदार सभासद मयत झालेने त्याचे सेवा सोसायटीकडील कर्जाची परतफेड त्याचे वारसांनी केलेली असलेने प्रोत्साहनपर अनुदानाचे बाबतीत मूळ कर्जदार मयत असून त्याकरीता वारसांना शासनाचे प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित ठेवणे योग्य होणार नाही. अटी शिथिल करुन नियमीत कर्ज परतफ़ेड करणार्‍या सर्व शेतकर्‍यांना न्याय द्यावा असे पत्रात म्हटले आहे.

Related Stories

सोळांकूरात थेट पाईपलाईनचे काम ग्रामस्थांनी रोखले

Abhijeet Khandekar

महाविकास आघाडी हे संभ्रमाचे सरकार : चंद्रकांतदादा पाटील

Abhijeet Khandekar

पीएम किसान योजनेत गौडबंगाल! राजू शेट्टी

Archana Banage

आजऱ्यात शिवसैनिक आक्रमक; प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Khandekar

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका जाहीर, साताऱ्यातील ५ पालिकांसाठी १८ ऑगष्ट मतदान

Rahul Gadkar

कोल्हापूर : बांबवडेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन तणाव

Archana Banage