Tarun Bharat

मंत्री असताना बैठका घेतल्या, मंजुरी का आणली नाही? माजी पालकमंत्र्यांना खासदार धनंजय महाडिकांचा सवाल

Advertisements

dhananjaymahadik vs satejpatil- कोल्हापूर जिल्ह्यात विमानतळाच्या नाईट लँडिंगला मंजुरी मिळाल्यानंतर राजकीय श्रेयवाद सुरूय. त्यावर खासदार धनंजय महाडिक दिल्लीतून कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. माजी पालकमंत्र्यांनी यासाठी पाठपुरावा केला. बैठका घेतल्या, मग मंत्री असताना याला मंजुरी का आणू शकला नाही? असा सवाल राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केला. यापुढे विरोधकांनी त्यांची कामे जाहीर करावीत मी त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असंही महाडिक म्हणाले आहेत.

विमानतळाचा प्रश्न गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रलंबित होता. कोल्हापूरचे विमानतळ मी खासदार असताना सुरू झाले. हे जग जाहीर आहे. पंधरा वर्षे हे विमानतळ बंद होते. त्याच्यासाठी २७४ कोटी रुपयांचा निधी लावला. पाच विमानसेवा त्या ठिकाणहून लावल्या. मात्र नाईट लँडिंग, टॅक्सीवे यासारखे अनेक प्रश्न गेल्या अडीच वर्षांपासून मार्गी लावण्याचा प्रयत्न माझ्याकडून सुरू होता. दीड महिन्यापूर्वी खासदार झाल्यानंतर मी रेल्वेमंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्यासोबत भेटून मंजुरीचे पत्र काढले. असे महाडिक म्हणाले. ‘त्यानंतर कोल्हापुरात श्रेय वादाचं राजकारण सुरू झाले. माजी पालकमंत्र्यांनी आम्हीच केलं हे सांगण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील अन्य दोन खासदारांची नावे घेतली. त्यामध्ये माझंही नाव घ्यावी अशी माझी इच्छा होती. पण माझं नाव घेतलं नाही. माझंही त्यामध्ये योगदान होते. मात्र माझी भूमिका कोल्हापूरचा विकास करण्यासाठीच आहे. मी सत्ताधारी भाजपचा खासदार असल्याने मला मंजुरीचा पत्रक लवकर मिळाले. असे खासदार महाडिक यांनी सांगितले. माजी पालकमंत्र्यांनी यासाठी बैठका घेतल्या असतील, पाठपुरावा केला असेल, मग काम का झाले नाही? मंत्री असताना मंजुरी आणता आली नाही? असा खोचक सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी केला.

गोकुळ,विधान परिषद, विधानसभा,लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर विरोधकाकडून एक भ्रम तयार केला. यापुढे महाडिकांना गुलाल लागणार नाही. असं समजू लागले. त्यामुळे सगळे आम्हालाच मिळेल. सगळ्यांना एकत्रित करून महाडिकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू होता. मात्र राज्यसभा निवडणुकीनंतर रणांगणात सज्ज असल्याचं धनंजय महाडिक यांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीत आम्ही कशा पद्धतीने रणांगणात आहे हे दाखवून दिले आहे. आगामी निवडणुकीतही दिसून येईल, असे महाडिक म्हणाले.

कोल्हापूरचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मी घोषित करत नाही. कारण काम केल्यानंतर विरोधक म्हणतात आम्ही पाठपुरावा करतो. पण विरोधकांनी त्यांची कामे जाहीर करावीत, त्या कामात धनंजय महाडिक हस्तक्षेप करणार नाही. थेट पाईपलाईनच्या कामात मी हस्तक्षेप केलेला नाही. त्याचे यश-अपयश त्यांच्यासोबत राहूदे. पंधरा वर्ष झाले, अजून किती वर्ष लागतील माहिती नाही. पण थेट पाईप लाईनच्या कामात मी भाग घेणार नाही. मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मी हा बास्केट ब्रिज करणारच. येणाऱ्या काळात बास्केट ब्रिज करून दाखवणार. महापुराच्या काळात कोल्हापूरचा संपर्क तुटणार नाही, असे धनंजय महाडिक म्हणाले. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे प्रकल्पाचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. या देखील प्रश्नी लवकरच मार्गी लावू असे महाडिक म्हणाले.

Related Stories

शरद पवारांची केंद्रीय मंत्र्यांशी फोनवरून चर्चा; काही तासांतच खत दरवाढीचा निर्णय मागे

Abhijeet Shinde

सुरज वशिष्ठची ऐतिहासिक कामगिरी; 32 वर्षानंतर ग्रीको रोमन कुस्तीत भारताला सुवर्ण

datta jadhav

महाराष्ट्रात 7 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

शिरवळवाडीत मुऱ्हा म्हैशीवर कोसळली वीज; शेतकऱ्यावर अर्थिक संकट

Abhijeet Shinde

शिवसेनेला विधानसभा कामकाज समितीवर घ्या- जयंत पाटील

Kalyani Amanagi

वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय

Rohan_P
error: Content is protected !!