ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी आहेत. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाकडून तासाभरात मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर बापट यांच्या आरोग्याविषयी अधिकची माहिती मिळू शकेल.
बापट यांनी काही दिवसांपूर्वी कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता. या मेळाव्याला बापट व्हिलचेअरवरून ऑक्सिजन सपोर्टवर आले होते. त्यानंतर मतदानाच्या दिवशीही त्यांनी ऑक्सिजन सपोर्टवर येऊन मतदानाचा अधिकार बजावला होता.