Tarun Bharat

PM नरेंद्र मोदींकडून शिंदेंना मोठं गिफ्ट, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांची केंद्रात वर्णी

Advertisements

शिंदे गटातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रातील माहिती व तंत्रज्ञान स्थायी समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून शिंदे गटाला पहिल्यांदाच अशाप्रकारे केंद्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. शिंदे गटाला पहिल्यांदाच केंद्रात अधिकृतरित्या प्रतिनिधित्व मिळाले आहे. आता आगामी काळातही मोदी सरकारकडून शिंदे गटाला अशा लहानसहान जबाबदाऱ्या देऊन केंद्रात अधिक प्रतिनिधित्व दिले जाणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. याआधी काँग्रेस नेते शशी थरुर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचं अध्यक्षपद होतं. त्यांच्या जागी आता प्रतापराव जाधव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलीय.

प्रतापराव जाधव यांचे वादग्रस्त विधान
कुठे आहे तो वाझे.. कुठे आहे अनिल देशमुख… यांच्याकडून ‘मातोश्री’वर दर महिन्याला १०० खोके जायचे, असे वक्तव्य जाधव यांनी केले होते. त्यावरुन बराच वादंग झाला होता. त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी आपल्या विधानावरुन घुमजाव केले होते. सचिन वाझे १०० कोटी रुपयांची वसुली करुन मातोश्रीवर पोहोचवत होता. असा आरोप त्यांनी ठाकरेंवर केला होता.

Related Stories

रत्नागिरीत बाजारपेठेतील तीन दुकानचालकांवर गुन्हा

Patil_p

सांगली जिल्ह्यात एक हजार 90 रूग्ण, 19 मृत्यू

Archana Banage

केंद्र सरकार राज्यांना देणार 12000 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज

datta jadhav

मलकापूर नगर परिषदेच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धाजंली अर्पण करत चिन हल्ल्याचा तीव्र निषेध

Archana Banage

वीज ,वादळाचे संकेत देणार ‘दामिनी अ‍ॅप’

Kalyani Amanagi

शिवा श्रीधरला 7 सुवर्ण तर नटराजला 3 सुवर्ण

Patil_p
error: Content is protected !!