Tarun Bharat

खासदार क्रीडा महोत्सवात राडा; भाजप नेत्याच्या मुलाची भर मैदानात पंच, आयोजकांना मारहाण

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

नागपुरात खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे. या अंतर्गत सुरू असलेल्या एका क्रिकेट मॅचदरम्यान पंचांनी निर्णय मागे न घेतल्याच्या रागातून भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने भर मैदानात प्रेक्षकांसमोरच पंच आणि आयोजकांना मारहाण केली. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या महोत्सवाला गालबोट लागले.

नागपूरातील छत्रपती चौकात खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत खामला इलेव्हन आणि स्टार इलेव्हन या दोन संघामध्ये क्रिकेट मॅच सुरू होती. यामधील एका संघात मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन आणि करन हे दोघेही खेळत होते. मॅच सुरू असताना अर्जुनने थ्रो बॉलच्या मुद्यावरुन पंचांशी वाद घालायला सुरुवात केली. पंचांनी त्याला समजावून सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता. अर्जुनने रागाच्या भरात मैदानातच गोंधळ घातला. मात्र, पंचांनी हा निर्णय मागे घेण्यास नकार दिल्याने त्याने भर मैदानात प्रेक्षकांसमोरच पंच आणि आयोजकांना मारहाण केली.

या गोंधळानंतर आयोजकांनी मॅच थांबवली. दोन दिवस उलटूनही आयोजक संदीप जोशी यांनी संबंधितांवर कारवाई केल्याने पंचांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दरम्यान, मुन्ना यादव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. या आधीही त्यांच्या मुलांकडून अशा प्रकारच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारणार

Archana Banage

आज बांबोळी स्टेडियमवर होणार ओडिशा – हैदराबाद यांच्यात लढत

Omkar B

कर्नाटक सरकार कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तात्पुरती हॉस्पिटल स्थापन करणार

Archana Banage

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी 20 कोटींचा निधी

Archana Banage

जयंत पाटलांच्या घराबाहेरील बॅनर्सनी वेधलं लक्ष, राज्यभर चर्चा

Archana Banage

कण्हेर धरणात युवक-युवतीची आत्महत्या

Patil_p