बेळगाव : नावगे क्रॉस येथील स्नेहम इंटरनॅशनल या कारखान्याला आग लागल्याची घटना आठवडाभरापूर्वी घडली होती. यामध्ये एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. तर संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी खासदार जगदीश शेट्टर यांनी घटनास्थळी पाहणी करून माहिती जाणून घेतली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी उद्योजक तसेच अधिकारीवर्गाला केले. मार्कंडेयनगर येथील मृत यल्लाप्पा गुंड्यापगोळ या तरुणाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, धनंजय जाधव, हेमंत पाटील, चेतन अंगडी, नागेंद्र देसाई, संतोष देसाई व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleआचरा गावातील शासनदप्तरी नोंद असणाऱ्या शासकीय जमिनी गहाळ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.