Tarun Bharat

MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याने पुण्यातील तरुणाची आत्महत्या


Advertisements

पुणे \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वप्नील लोणकर असं २४ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

स्वप्नीलने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइट नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखरडल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. स्वप्निलने सुसाईड नोटच्या सुरुवातीलाच MPSC मायाजाल आहे, यात पडू नका असं आवाहन देखील केलं आहे. २९ जून रोजी पुण्यातील फुरसंगी परिसरातील राहत्या घरात स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली.
२०१९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्य सेवेच्या परीक्षेचा निकाल २०२० मध्ये लागला. या परीक्षेत स्वप्नीनला यश मिळाले. परंतु एक १ वर्षे पूर्ण होऊनही नियुक्त न झाल्याने नैराश्येत स्वप्नीलने टोकाचे पाऊल उचललं.

उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झाल्यानं नाशिकमध्ये या विरोधात 19 जून रोजी आंदोलनही झाले, मात्र तरीही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. परंतु स्वप्नीलच्या या आत्महत्येमुळे एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षांचा प्रश्न किती गंभीर बनत असल्याचे दिसून आले.

Related Stories

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात 6,112 नवे रुग्ण, 44 मृत्यू

Tousif Mujawar

रशियाने तयार केले कोरोनावर प्रभावी औषध

datta jadhav

दिवंगत अरुण निगवेकर यांना शैक्षणिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर

Tousif Mujawar

प्रसूतीसाठी लाच स्वीकारताना ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष आडगळे ताब्यात

Archana Banage

…पण हे मुंबई मॉडेल नाही, तर मृत्यूचं मॉडेल; फडणवीसांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

Archana Banage

इंग्लंडच्या शिष्टमंडळाची कार्ला नगरीला भेट

datta jadhav
error: Content is protected !!