Tarun Bharat

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला होणार


मुंबई \ ऑनलाईन टीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. ४ सप्टेंबरला होणार संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून देखील सातत्यानं परीक्षा कधी आयोजित केली जाणार यांसदर्भात विचारणा केली जात होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रक जारी करत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा चार सप्टेंबरला होणार असल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्रा लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट -ब संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आलेल्या पत्रावरून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ३ ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. तर, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

Related Stories

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु; शिवसेना कोणाची? ठाकरेंची की शिंदेंची ?

Abhijeet Khandekar

मिरज-कोल्हापूर पॅसेंजर उद्यापासून सुरू

Archana Banage

महाविकास आघाडी संदर्भात विरोधकांचं कटकारस्थान अपूर्णच राहणार – नवाब मलिक

Archana Banage

देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 74.3 कोटींवर

datta jadhav

Video – विरोधी पक्ष संपुष्टात आणण्यासाठी लोकशाही धोक्यात घातली : पृथ्वीराज चव्हाण

Archana Banage

गुजरातच्या निकालावर देशाचा मूड दिसून येत नाही : शरद पवार

Abhijeet Khandekar