Tarun Bharat

MPSC ने सुरु केलं ट्विटर हँडल, अवघ्या २४ तासात टीकेचा भडीमार

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाची अधिकृत माहिती ट्विटर हँडलवर मिळणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाचे अर्थात एमपीएससीचं (MPSC) अधिकृत ट्विटर हँडल सुरु करण्यात आले आहे. एमपीएससीनं काल, शुक्रवारी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

या ट्विटर हॅण्डलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रकं, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील, अशी देखील माहिती देण्यात आली आहे. मात्र, पहिल्याच ट्विटला रिप्लायचा ऑप्शन बंद करून ठेवला आहे. त्यामुळे, एमपीएससीचं हे ट्विटर हँडल सुरु झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच टीकेचं धनी झालेलं पाहायला मिळाले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी एमपीएससीकडून हा रिप्लायचा ऑप्शन बंद करण्यात आल्याची टीका होताना पाहायला मिळत आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’साठीची संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे.

Related Stories

कंत्राटी डॉक्टर, रुग्णवाहिका चालकांचे दिवाळीपूर्वीच दिवाळे!

Patil_p

पुणे विभागातील 4.84 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

अंबरनाथ : एमआयडीसीमधील बिस्कीट कंपनीला भीषण आग

Rohan_P

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मिरजकर तिकटी येथे आंदोलन

Abhijeet Shinde

जैन सभेच्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन

Abhijeet Shinde

अनंतनागमध्ये 6 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

datta jadhav
error: Content is protected !!