ऑनलाईन टीम / नवी मुंबई
दिवसेंदिवस समोर येणारे परिक्षातील घोटाळे आणि वर्षानुवर्षे परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोसावा लागत असलेला अर्थिक बुर्दंड आणि मानसिक त्रास अशी विद्यार्थ्यांची स्थिती असतानाच एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निराशेत भर घालणारा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला असुन 2 जानेवारी 2021 रोजी नियोजीत असलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे. मात्र वय वाढलेल्या उमेदवारांनाही पुन्हा संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एका पत्राद्वारे याबाबत माहिती दिली असुन रविवार दिनांक 02 जानेवारी, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा- 2021 पुढे ढकलण्यात येत आहे. असं असलं तरी परीतक्षेबाबत संभाव्य तारीख लोकसेवा आयोगाने अद्याप आपल्या संकेतस्थळावर दिलेली नाही. मात्र येत्या काही दिवसात परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे परिक्षार्थींना पुन्हा आयोगाच्या नव्या वेळापत्रकाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा परिक्षा करणाऱ्या युवकांना राज्य सेवा परिक्षा देण्यापुर्वी आपल्या संयमाची परिक्षा द्यावी लागणार हे मात्र निश्चित.