Tarun Bharat

एमआर भंडारी स्कूल,सेंटजॉन काकती विजयी

35 वी बाबुराव ठाकुर चषक हॉकी स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित 35 व्या बाबुराव ठाकुर आंतरशालेय हॉकी स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एमआर भंडारी संघाने मदनी संघाचा 3-0, मुलींच्या सामन्यात सेंटजॉन काकती संघाने एमआर भंडारी संघाचा 2-0 असा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले.

कॅम्प येथील मेजर बी. ए. सय्यद हॉकी मैदानावर खेळविण्यात आलेल्या मुलांच्या गटातील सामन्यात एमआर भंडारी संघाने मदनी संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात 17 व्या मिनिटाला सुजल डिगाइच्या पासवर प्रविण जुटपण्णवरने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात भंडारी संघाला मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 27 व्या मिनिटाला भंडारी संघाच्या प्रविण जुटपण्णवरच्या पासवर सुजल डिगाइने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 41 व्या मिनिटाला एमआर भंडारीच्या सागर वाजंत्रीच्या पासवर प्रविण जुटपण्णवरने दुसरा गोल करुन 3-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात मदनी संघाला गोल करण्यात अपयश आले.

मुलींच्या गटात खेळविण्यात आलेल्या सामन्यात सेंटजॉन काकतीने एमआर भंडारी संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात 19 व्या मिनिटाला धनश्रीच्या पासवर सानिकाने पहिला गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 31 व्या मिनिटाला सानिकाच्या पासवर धनश्रीने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात भंडारी संघाला गोल करण्यात अपयश आले.

बुधवारचे सामने – इस्लामिया वि. बाशिबन यांच्यात सकाळी 11 वाजता तर मुलींच्या गटात जीजी चिटणीस वि. ज्ञानमंदिर यांच्यात दुपारी 12.30 वाजता.

Related Stories

अत्याधुनिक कोरोना तपासणी केंद्राचे उद्या उद्घाटन

Amit Kulkarni

खडेबाजार प्रवेशद्वार बंद नागरिकांची गैरसोय

Amit Kulkarni

शहराच्या मध्यवर्ती भागात सारे काही बंद

Patil_p

तांत्रिक बिघाडामुळे परीक्षार्थींना फटका

Patil_p

कोविड काळात केएलई हॉस्पिटलचे कार्य उत्कृष्ट

Amit Kulkarni

केएलएस आयएमईआरमध्ये वेबिनारचे आयोजन

Omkar B