क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य शरीरसौष्टव संघटना, दसरा स्पोर्ट्स कमिटी, युवजन क्रीडा खाते म्हैसूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मि. दसरा 2022’ राज्यस्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा शुक्रवार दि. 30 सप्टेंबर रोजी म्हैसूर चामुंडेश्वर विहार स्टेडियम येथे आयोजिली आहे.
स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 55 किलो गट, 60, 65, 70, 75, 80 व 80 किलोवरील अशा सात गटात घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील 3 विजेत्यांना पदके, प्रमाणपत्र व रोख रक्कम, भेटवस्तू देवून गौरविणार आहे. मि. दसरा किताब विजेत्याला मानाचा किताब, आकर्षक चषक, रोख रक्कम तर उत्कृष्ट पोझरलाही रोख रक्कम व चषक देवून गौरविणार आहे. इच्छुकांनी ऍन्थोनी मोसेस, सदाशिव भट,गंगाधर एम. यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शरीरसौ÷व संघटनेचे अध्यक्ष जे.निलकंठ यांनी केले आहे.