शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा (SSC Ruselt) निकाल यंदा १७ जून रोजी ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. हा निकाल दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.