श्वान पथकाकडून शोध जारी
प्रतिनिधी /बेळगाव
तब्बल 18 दिवसानंतरही बिबटय़ा वनखात्याच्या हाती न लागल्याने आता बिबटय़ाच्या शोधासाठी मुधोळ जातीच्या श्वानांची मदत घेतली आहे. हुक्केरी येथील विशेष श्वान पथक दाखल झाले असून, बिबटय़ाच्या शोधासाठी आता रेसकोर्सच्या मैदानात श्वान उतरले आहेत. त्यामुळे आता श्वानपथक बिबटय़ाचा शोध लावणार का? हेच पहावे लागणार आहे.
सोमवारी बिबटय़ा वनखात्याच्या हाती लागला होता. मात्र बेजबाबदार पणामुळे पुन्हा बिबटय़ा निसटला आहे. शिवाय रेसकोर्स परिसरात त्यांने आसरा घेतला आहे. दरम्यान अथक प्रयत्नानंतरही वनखात्याला अपयश आले आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी बिबटय़ाच्या शोधासाठी रेसकोर्सच्या मैदानात श्वानपथक उतरले आहे. शिवाय बिबटय़ाचा शोध सुरू झाला आहे. त्यामुळे श्वानाच्या माध्यमातून बिबटय़ाचा शोध लागणार का? याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बिबटय़ाच्या शोधासाठी मुधोळ हाऊंड श्वानांची मदत घ्यावी अशा सूचना केल्या होत्या. सोमवारी रेसकोर्स परिसरात पलायन केलेल्या बिबटय़ाचा माग काढण्यासाठी हुक्केरी येथील विशेष प्रशिक्षित श्वान पथकाला पाचारण केले आहे. आक्रमक आणि शोध घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱया मुधोळ जातीच्या श्वानाचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे मुधोळ श्वान बिबटय़ाचा शोध लावणार का? हेच आता पहावे लागणार आहे.
दरम्यान 24 तासात बिबटय़ाचा शोध घेऊन जेरबंद करावे, अशा सूचना वनमंत्री उमेश कत्ती यांनी अधिकाऱयांना केल्या आहेत. सोमवारी दिवसभर रेसकोर्स परिसर पिंजून काढला आहे. शिवाय शिकारीसाठी ओळखल्या जाणाऱया मुधोळ श्वानाच्या माध्यमातून बिबटय़ाचा शोध सूरू झाला आहे. त्यामुळे मुधोळला बिबटय़ाचा माग लागणार का? याकडेच लक्ष लागले आहे.