Tarun Bharat

शहरात मोहरम गांभीर्याने

ताबुतांची विविध भागात मिरवणूक-विसर्जन

प्रतिनिधी /बेळगाव

मुस्लीम बांधवांनी मंगळवारी भक्तिभावाने व गांभीर्याने मोहरम आचरणात आणला. पाच दिवस पंजा व ताबूत यांचे पूजन केल्यानंतर मंगळवारी शहराच्या विविध भागातून ताबूत मिरवणूक काढण्यात आली. बेळगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये गांभीर्याने मोहरम पाळण्यात आला.

शहरात ठिकठिकाणी पंजा व ताबूत ठेवण्यात आले होते. मंगळवारी मोहरमनिमित्त हे ताबूत शहराच्या विविध भागातून मिरवणुकीने किल्ला तलाव व इतर भागात विसर्जित करण्यात आले.

शिवाजीनगर, खंजर गल्ली, काळी आमराई, दरबार गल्ली, गणपत गल्ली, वडगाव, शहापूर यासह विविध भागात दिवसभर मिरवणुका सुरू होत्या. यामध्ये युवावर्गाची संख्या सर्वाधिक होती.

हिंदू-मुस्लीम बांधव एकत्रितपणे मोहरम साजरा करीत असतात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर अनेकांनी चांदीचा घोडा, लाईट यासह विविध वस्तू दान स्वरूपात दिल्या. मुस्लीम धर्मगुरुंनी मोहरमबद्दल संदेश दिला. शहर व उपनगरांमध्ये मोहरम गांभीर्याने पाळण्यात आला.

बेळगाव जिल्हय़ातील यरगट्टी तालुक्यातील मदलूर गावात हजारो लोकांच्या उपस्थितीत मोहरम आचरणात आला. हिंदू-मुस्लीम बांधव एकत्रितपणे मोहरम साजरा करीत असल्याचे दिसून आले. मोहरममुळे समाजातील एकोपा पुन्हा एकदा दिसून आला.

Related Stories

मृत्युंजयनगरातील जलवाहिनीला गळती

Amit Kulkarni

अनगोळ चौथे गेट ते बेम्को रस्त्यावर गतिरोधक बसवा

Amit Kulkarni

एकमेव पॅसेंजरही रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय

Amit Kulkarni

बुडाला आम्ही कदापीही जमीन देणार नाही

Patil_p

नार्वेकर गल्ली जोतिबा मंदिरात आज कटल्याचे आगमन

Amit Kulkarni

डॉ. आंबेडकर आधुनिक भारताचे पितामह

Amit Kulkarni