ऑनलाईन टीम/तरुण भारत
प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे (Reliance) सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना त्याचा मुंबईतील रुग्णालयात फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असून हा फोन बिहारमधून आल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांच्या पथकाने एका आरोपीला बिहारच्या दरभंगा येथून अटक केली आहे. राकेश कुमार मिश्रा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या आरोपीला घेऊन पोलिसांचे पथक मुंबईत आले असून त्याची चौकशी केली जात आहे. (Mukesh Ambani and family death threats Mumbai Police arrest person from Bihar)
मुकेश अंबानी धमकी प्रकरणी राकेश कुमार मिश्रा या आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. आरोपीवर आयपीएसच्या कलम 506(2),507 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. आरोपी बेरोजगार असून त्याने धमकी का दिली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुंबई पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी मुंबईत आणले आहे.
हे ही वाचा : भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे ६६ मुलांचा मृत्यू?; WHO कडून अलर्ट जारी
दरम्यान, अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन मुंबई पोलिसांनी याचा तपास सुरू केला होता. दरम्यान हा फोन बिहार येथून आल्याचे पोलिसांना कळले. त्यांनी तपास पथक बिहारच्या दरभंगा येथे पाठवले. त्यांनी राकेश कुमार मिश्राला तेथून अटक केली. राकेश कुमार मिश्रा हा बेरोजगार असून त्याने हे कृत्य का केले याचा तपास पोलिस करत आहेत. मुंबई पोलिसांच्या एका पथकाने बिहार पोलिसांच्या मदतीने बुधवारी मध्यरात्री बिहारमधील दरभंगा येथील एका ब्लॉकमधून राकेशला अटक केली, अशी माहिती झोन दोनचे डीसीपी नीलोत्पल यांनी दिली.
बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance) सर एचएन हॉस्पिटलच्या (HN Reliance Foundation Hospital) लॅंडलाईनवर एक अज्ञात नंबरवरुन कॉल आला होता. हे हॉस्पिटल बॉंबने उडवून देण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांनाही जीवे मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.