ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उद्योगपती गौतम अदानींना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने नुकतीच जगातील टॉप दहा श्रीमंतांची यादी जाहीर केली. त्यानुसार अंबानी यांची एकूण संपत्ती 84.3 अब्ज डॉलर आहे.
फोर्ब्सच्या यादीनुसार, गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना मागील 24 तासात 10 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. तर अंबानी नवव्या क्रमांकांवर आहेत. एक दिवस आगोदर अंबानी या यादीत अकराव्या स्थानावर होते.
लक्सरी ब्रँड लुई व्हिटनचे मालक बर्नार्ड अर्नाल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती 214 अब्ज डॉलर आहे. टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 178.3 अब्ज डॉलर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ॲमेझाँनचे मालक जेफ बेजोस आहेत. त्यांची एकूण संपत्ती 126.3 अब्ज डॉलर आहे.