नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय गृह मंत्रालयाने उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सुधारित श्रेणीनुसार त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाईल. यापूर्वी अंबानींना झेड श्रेणीची सुरक्षा होती. अलीकडेच मुकेश अंबानी यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर गृह मंत्रालयाने त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. गुप्तचर माहितीनंतर गृह मंत्रालयाने मुकेश अंबानींची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. धोक्मयाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने अंबानींना झेड प्लस सुरक्षा दिली आहे.
गेल्या वषी उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर बॉम्बसदृश वस्तू सापडल्यानंतर आणि रेकी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गृह मंत्रालयाने त्यांची सुरक्षा मजबूत करण्यावर चर्चा केली होती. भारतीय गुप्तचर संस्थेने त्यांची चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला होता. धोक्मयांचे मूल्यांकन केल्यानंतर सुरक्षा श्रेणी वाढविण्यात आली. भारतातील मान्यवर व्यक्तींना झेड प्लस सुरक्षा कवच दिले जाते. गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालाच्या आधारे देशात सध्या असलेल्या समाजकंटकांकडून त्यांना धोका निर्माण झाल्यास त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक प्रकारची सुरक्षा दिली जाते.