प्रतिनिधी /म्हार्दोळ
अध्यापन व अध्ययन या प्रक्रियेत ज्ञान आणि प्रेम यांचा पोषक व पूरक समतोल हवा असं प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यीक, अनुवादक मुकेश थळी यांनी केलं. प्रियोळच्या शिक्षा सदन हायस्कूलच्या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात ते मुख्य पाहुणे या नात्याने बोलत होते.
विद्यार्थ्यांचं लक्ष जेव्हा आपल्या ध्येयाकडे व महत्वाकांक्षेकडे असतं तेव्हा कितीही अडचणी आल्या तरी त्यांवर मात करून यशप्राप्ती शक्मय होते. नम्रता, साधेपणा, ज्ञानाप्रती लालसा व अनिवार जिज्ञासा हे विद्यार्थ्यांचे अलंकाररूपी सद्गुण आहेत व या गुणांचा विकास करत राहा, असे आवाहन करुन थळी यांनी माजी विद्यार्थी म्हणून आपल्या विद्यार्थी दशेतील स्मृती त्यांनी रंजक विनोदी ढंगात जागवल्या. आपली शाळा व शिक्षक यांनी आपल्यातील साहित्यीकाचा अभ्यासकाचा पाया रचला असं प्रांजळपणे थळी यांनी सांगितले.
इंजिनियर वल्लभ वेलिंगकर, संदीप निगळये, मुख्याध्यापिका शोभा प्रियोळकर, राजेन्द नायक, विजयकुमार कामत, श्री ए ए फेर्ना?डीस यांचीही यावेळी भाषणे झाली. गुणवंत विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्या यावेळी प्रदान करण्यात आल्या. सुचिता सतरकर यांनी प्रभावी सूत्रनिवेदन केले.