युपी एसटीएफला मिळाले मोठे यश
वृत्तसंस्था/ मथुरा
उत्तरप्रदेशच्या मथुरा येथे माफिया मुख्तार अंसारीचा एक शार्प शूटर पंकज यादव उत्तरप्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत बुधवारी मारला गेला. पंकजसोबत चकमकीवेळी आणखी एक गुंड होता. तो चकमकीदरम्यान पळून गेला असल्याची माहिती युपी एसटीएफने दिली आहे.
कुख्यात गुन्हेगार पंकज यादव याच्याविरोधात 24 हून अधिक गुन्हे नोंद होते, यात हत्येचा गुन्हा देखील सामील होता. पंकज यादव विरोधात मऊ येथील बहुचर्चित मन्ना सिंह हत्याप्रकरणातील साक्षीदार रामसिंह आणि त्यांचा सुरक्षारक्षक सतीश कुमारच्या हत्येचाही आरोप होता.
पंकज यादव हा मुख्तार अंसारी, शहाबुद्दीन आणि मुन्ना बजरंगी टोळीसाठी देखील शार्प शूटर म्हणून काम करायचा. मथुरा जिल्ह्यातील रोसू गावानजीक बुधवारी पहाटे सुमारे 5.20 वाजता चकमक झाली असून यात पंकज यादव ठार झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.