तरुणभारत ऑनलाइन टीम
अभिनेत्री मुक्त बर्वे ही तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.मुक्ता लवकरच तिच्या चाहत्यांसाठी एक नवा चित्रपट घेऊन येत आहे.
सत्य घटनांवर आधारित ‘वाय’ या चित्रपटात मुक्ता मुख्य भूमिका साकारणार आहे. नुकताच तीन या चित्रपटाचं पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलं आहे.
मुक्ताने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये मुक्ताच्याडोळ्यांत खंबीरपणे लढण्याची ताकद दिसत असून बाजूला आगीचे लोळ दिसत आहेत. तर लाल रंगाच्या ‘वाय’ मध्ये ग्लोव्हस घातलेल्या हातामध्ये एक हत्यार दिसत आहे. घाबरून मागे हटणारी ती नाही ..कल्पनेपलीकडील वास्तवाची ..ती च्या लढ्याची गोष्ट ..असं या पोस्टर खाली कॅप्शन दिल आहे. हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.वाय या चित्रपटाची निर्मिती कन्ट्रोल-एन प्रॉडक्शनने केली आहे. अजित सूर्यकांत वाडीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.