Tarun Bharat

मुलायमसिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक

Advertisements

गुरुग्राममधील मेदांता इस्पितळात आयसीयूमध्ये उपचार

गुरुग्राम / वृत्तसंस्था

गेल्या आठवडय़ापासून येथील मेदांता रुग्णालयात दाखल असलेले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांची प्रकृती रविवारी अचानक बिघडली. आता त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले आहे. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांच्यावरील उपचारांसाठी तज्ञ डॉक्टरांचे विशेष वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले आहे.

मुलायमसिंह यादव यांना किडनी संसर्गासोबतच रक्तदाबाचाही त्रास होता. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे, असे मेदांता हॉस्पिटलच्या पीआरओने सांगितले. त्यांच्या प्रकृतीसंबंधीची सर्व माहिती त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुलायमसिंह यादव 26 सप्टेंबरपासून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. रविवारी दुपारनंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्यानंतर त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपल आणि मुलगा अर्जुनसोबत मेदांता हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तसेच शिवपालसिंह यादव हे देखील रुग्णालयात आहेत.

Related Stories

देशात 85,362 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

कुलगाममध्ये चकमक; पाकिस्तानी दहशतवाद्याला कंठस्नान

datta jadhav

“लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ३०० जागा जिंकू शकत नाही”

Archana Banage

देशातील पहिले आदर्श गाव टेकुलोडु

Patil_p

कुंभमेळय़ात 1700 जणांना कोरोनाबाधा

Amit Kulkarni

भारत-जपान संबंध अत्यंत बळकट

Patil_p
error: Content is protected !!