Tarun Bharat

Mulayam Singh Yadav : मुलायम सिंह यादव यांची तब्येत खालावली; अतिदक्षता विभगात दाखल

Advertisements

लखनौ : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांची प्रकृती खालावली असून त्यांना गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअर युनिटमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या विशेष टीमकडून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. यासंबंधीची माहिती हॉस्पिटलच्या एका निवेदनातून जाहिर केली गेली आहे.

22 ऑगस्टपासून समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून काल रात्री त्यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. समाजवादी पक्षातील एका जेष्ठ नेत्याने आपल्या ट्विटमध्ये मुलायम सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. सिंग यांचे चिरंजिव आणि सपा प्रमुख अखिलेश यादव गुरुग्राम रुग्णालयात दाखल झाले आहेत.

यासंबंधीची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव यांच्याशी बोलून मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी मुलायम सिंह यादव यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुलायमसिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले आहे. ते यूपी विधानसभेवर दहा वेळा आणि लोकसभेचे खासदार म्हणून सात वेळा निवडून आले आहेत. ते सध्या लोकसभेत मैनपुरी मतदारसंघतून विद्यमान खासदार आहेत.

Related Stories

जेईई, नीट परीक्षा निर्धारित वेळेतच

Patil_p

दिल्लीत दिवसभरात 1808 नवे कोरोना रुग्ण; 20 मृत्यू

Tousif Mujawar

अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला

Archana Banage

केंद्र सरकारकडून सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी

datta jadhav

पुष्करसिंह धामी चंपावतमधून लढणार

Amit Kulkarni

सर्व राफेल लढाऊ विमाने एप्रिल 2022 पर्यंत मिळणार

Patil_p
error: Content is protected !!