ऑनलाईन टिम : मुंबई
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस कथित गुन्हेगार सुकेश चंद्रशेखरशी संबंध असल्याच्या कारणावरून अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आहे. तिने अबूधाबी येथे होणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ दिवस परदेशात जाण्याची परवानगी मागणारा अर्ज दिल्ली न्यायालयात दाखल केला असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच ₹ 7.27 कोटींची मालमत्ता केंद्रीय एजन्सीने जप्त केलेल्या अजून एका अभिनेत्याने फ्रान्स आणि नेपाळला जाण्यासाठी परवानगी मागितली आहे.
या प्रकरणात तिच्याविरुद्ध एक लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले होते, ज्यामुळे तिला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले होते. तपास सुरू असल्याने आणि जॅकलीनचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन तपासले जात असल्याने, जॅकलीनला देश सोडण्याची परवानगी नाही.
जॅकलीनची या प्रकरणात अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, या अभिनेत्रीने सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून भेटवस्तू घेतल्याचे कबूल केले आहे. सुकेशने एका चित्रपटाची ऑफर देऊन आपल्याशी संपर्क साधला होता तसेच सुकेशने स्वत:ची ओळख चॅनल मालक म्हणून करून दिल्याचा दावा जॅकलिनने केला आहे.