Tarun Bharat

फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रसारमाध्यमांपुढे ग्वाही

प्रतिनिधी/मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांपुढे दिली.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कारागफहातील कैद्यांसाठी स्पर्धा भजन आयोजित केली आहे. त्या स्पर्धेच्या उद्धाटनप्रसंगी त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात माहिती दिली.

ते म्हणाले, ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी कोणतेही राजकारण न करता प्रयत्न करण्यात येतील. ओबीसी आरक्षणासंदर्भात भाटिया कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. इम्पिरिकल डेटा मिळवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाहीदेखील अजित पवार यांनी दिली. मध्य प्रदेश सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवर जागा पन्नास टक्क्यांवर न जाऊ देता ओबीसींना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न राहील. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सर्वांनीच आदर करायला हवा, असेही ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करणे आपल्या हातामध्ये आहे. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठीच भाटिया समिती नियुक्त केली आहे. भाटिया समितीदेखील यावर काम करत आहे. विरोधक काय टीका करत आहेत, याकडे लक्ष न देता आम्ही मनापासून प्रयत्न करत आहोत, असेही पवार म्हणाले.

..तर कैद्यांमध्येही सकारात्मक बदल
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने कारागफहातील बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गफहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. ‘या स्पर्धेच्या माध्यमातून कैद्यांनी चांगली पुस्तके वाचली आणि आपल्या विचारात बदल घडवला तर निश्चितपणे सकारात्मक बदल होईल. मोठय़ा प्रमाणात आरोपी कमी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळेल, असे अजित पवार म्हणाले.

Related Stories

रोड रॉबरी करणारी टोळी गजाआड

Patil_p

मोदींविरोधात पोस्टरबाजी ; दिल्लीत 25 जणांना अटक

Patil_p

उस्मानाबाद : तरुणीच्या खुनाबद्दल तीघांना जन्मठेप

Archana Banage

राजकीय पक्षांचे लक्ष्य ‘युथ ते बुथ’ !

Rahul Gadkar

शिरोळ पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव

Archana Banage

राजस्थान : जयपूर विमानतळावर 14 प्रवाशांकडून 32 किलो सोने जप्त

Tousif Mujawar