डिव्हिआरही मशीनही हस्तगत; संशयितांची आज न्यायालयापुढे हजेरी
रत्नागिरी प्रतिनिधी
ठाणे येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजयराज कोठारी यांच्या खून प्रकरणात सीसीटिव्ही फुटेज पोलिसांकडून जप्त केले आहे. कोठारी हे त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात जात असल्याचे या सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत आह़े तसेच दुकानात खून झाल्यानंतर गोणीत भरलेला कोठारी यांचा मृतदेह संशयित आरोपी रिक्षामध्ये भरून नेत असल्याचेही सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आह़े कोठारी यांच्या खून प्रकरणात सीसीटिव्ही फुटेज अत्यंत महत्वाचा पुरावा असल्याचे मानले जात आह़े.
पोलिसांकडून सीसीटिव्ही फुटेज रेकॉर्ड करणारी डिव्हिआर मशीनही हस्तगत करण्यात आली आह़े संशयित आरोपी यांना त्रिमूर्ती ज्वेलर्स ते गुहागर तालुक्यातील आबलोली येथील पऱ्या या ठिकाणी नेण्यात आल़े यावेळी खूनाच्या घटनेचे प्रात्यक्षिक संशयित आरोपी यांच्याकडून करून घेण्यात आल़े दरम्यान बुधवारी संशयित आरोपी यांची पोलीस कोठडी समाप्त होत असल्याने पुन्हा त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आह़े यावेळी पोलिसांकडून पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े.
रत्नागिरी शहर पोलीस निरिक्षक विनीत चौधरी हे कोठारी यांच्या खूनाचा तपास करत आहेत़ मागील 6 दिवसांपासून कोठारी खून प्रकरणाचा कसून तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े खून प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यात येत आहेत़ 19 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले किर्तीकुमार कोठारी यांचा शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होत़ा आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले आह़े या प्रकरणी पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण सुभाष खेडेकर (42, ऱा खालची आळी रत्नागिरी), रिक्षाचालक महेश मंगलप्रसाद चौगुले (39, ऱा मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, ऱा भाट्ये खोतवाडी) यांना अटक केली आह़े.
किर्तीकुमार कोठारी यांचा खून केल्यानंतर 19 सप्टेंबर रोजी तीनही संशयितांनी मृतदेह एका मोठ्या गोणीमध्ये भरल़ा यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास महेश चौगुले याच्या रिक्षात हा मृतदेह भरण्यात आला होत़ा तसेच मृतदेह आबलोलीतील जंगलमय परिसरात असलेल्या पऱ्या मध्ये संशयितांनी फेकून दिल़ा कोठारी हे रत्नागिरी येथून बेपत्ता झाल्याची तकार त्यांचा मुलगा करण याने शहर पोलिसांत दाखल केली होत़ी यानंतर पोलिसांकडून शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होत़े.
सीसीटिव्ही फुटेजमध्ये किर्तीकुमार कोठारी हे दुकानात जाताना दिसले होत़े मात्र दुकानातून बाहेर पडताना दिसून आले नाहीत. याच ठिकाणी पोलिसांना काही तरी घातपात झाल्याचा संशय आल़ा. यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास किर्तीकुमार कोठारी यांचा मृतदेह गोणीमध्ये भरून रिक्षामध्ये टाकण्यात आल़ा यानंतर ही रिक्षा रत्नागिरी शहरातून मजगांव पाटीलवाडीमार्गे गुहागर-आबलोली येथे नेण्यात आल़ी दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटिव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आह़े कोठारी यांच्या खून प्रकरणाची उकल ही सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून करण्यात आली होत़ी खून खटल्यात हा अत्यंत महत्वाचा पुरावा ठरणार असल्याने पोलिसांकडून सीसीटिव्ही फुटेज जप्त करण्यात आले आह़े