मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत; पावसाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण विस्तार; पहिल्या टप्प्यात 13 जणांचा समावेश शक्य
मुंबई प्रतिनिधी
राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले असले तरीही अद्याप मंत्रीमंडळ पूर्णपणे अस्तित्वात आलेले नाही. या मंत्रीमंडळामध्ये कोणाची अपेक्षापूर्ती होणार आणि कोणाचा अपेक्षा भंग होणार याबाबत मोठी चर्चा सुरु आहे. तथापि पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार हा आषाढी एकादशीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबतचे संकेत दिले आहेत. तर याच मुद्यावरुन ते दिल्ली दौऱयावर असून गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचे म्हटले जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पहिल्या टप्प्यात 13 मंत्र्यांना मान्यता दिली असावी आणि यामध्ये भाजपचे आठ तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे 5 सदस्य असतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक वाचा- आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यी वसतिगृहाला छ.शाहु महाराजांचे नाव देण्याची मागणी
शिंदे गटाला 15 ते 17 मंत्रीपदे शक्य
शिवसेनेतील शिंदे यांचे समर्थक आणि भाजप मिळून 156 आमदार आहेत. मात्र सर्वांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही हे नक्की आहे. तीन आमदारांमागे 1 मंत्रीपद हे सूत्र ठरलेले आहे. त्यामुळे शिंदे गटाला 15 ते 17 मंत्रीपदे मिळणार आहेत. त्यापैकी काहीजण आतापासूनच दबावतंत्राचा वापर करू लागले आहेत. शिंदेगटात जे मंत्रीपदावर पाणी सोडून सहभागी झाले आहेत त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार हे नक्कीच आहेत. उलट जे राज्यमंत्री आहेत त्यांना बंडखोरीबाबत बढती म्हणून कदाचित पॅबिनेट मंत्रीपदही मिळण्याची शक्यता आहे. मात्र इतर आमदार मंत्रीपदासाठी दबावतंत्राचा वापर करत आहेत. त्यांच्यापैकी एकनाथ शिंदे कितीजणांचे समाधान करणार, हा प्रश्न आहेच.
शिंदे-फडणवीसांची सावध पावले
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा कायद्याचा धाक आहे. त्यामुळे ते सुद्धा हुरळून न जाता टप्प्याटप्प्याने पाऊल टाकत आहेत. प्रथम दोघांचा शपथविधी, नंतर अध्यक्षपदाची निवड, त्यानंतर विश्वासदर्शक ठराव आणि न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाचा काहीसा विस्तार करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे. त्यामुळे मंत्रिपद न मिळणारे आमदारही अभी नही तो और सही हेच धोरण अवलंबण्याची शक्यता अधिक आहे.
महत्त्वाच्या पदांना प्राधान्य
13 जुलै रोजी होणाऱया मंत्रिमंडळ विस्तारात गफहमंत्री, अर्थमंत्री, महसूलमंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्री अशा महत्त्वाच्या मंत्र्यांचा शपधविधी निश्चितच होईल. त्यामध्ये भाजपच्या मंत्रिमंडळातही नवे चेहरे दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. गफहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना मिळणार की दुसऱया कुणाकडे जाणार याबाबतही उत्सुकता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शपथविधी
शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार बेकायदेशीरपणे सत्तेत आल्याचा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. याचा निकाल सोमवार 11 जुलै रोजी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच निकालानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यानंतर उर्वरित 12 ते 13 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. म्हणजे न्यायालयाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला तर हा शपथविधी होईल. म्हणूनच 13 जुलैला शपथविधी ठेवण्यात आला आहे. पण निकाल विरोधात गेला तर काय, हा सुद्धा प्रश्न आहेच.
कायदे, नियम पाळल्याचा शिंदेंचा दावा
शिवसेनेने शिंदे गटातील 16 जणांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांना अपात्र ठरवले जावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. तथापि मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही शिवसेनेतच आहोत, आम्ही सगळे नियम आणि कायदे पाळले आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांनी आमच्या गटाला मान्यता दिली आहे. त्याचबरोबर न्याय व्यवस्थेवरही आमचा विश्वास असून चुकीचे काही केले नसल्याने आम्हाला न्याय मिळेल.
बंडखोरांना दारे खुलीच आहेत
शिंदे यांच्या म्हणण्यानुसार ते शिवसेनेतून फुटलेले नाहीत. ते आणि त्यांच्यासोबतचे आमदार शिवसेनेतच आहे. मात्र पक्षाची धोरणे न पटल्याने त्यांनी उठाव केला आहे. दुसरे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दारे पूर्णतः बंद केलेली नाहीत. आमदार प्रकाश सुर्वे यांची आदित्य ठाकरे यांच्याबरोबर विधान भवन परिसरात अचानक भेट झाली तेव्हा त्यांनी प्रकाश सुर्वे यांना ‘बघा, वाटले तर या’ असे निमंत्रण दिले आहे. तर किरिट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना माफिया म्हणताच, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांनी त्यांना खबरदार, उद्धव ठाकरे यांना माफिया म्हणाल तर अशी तंबीच दिली आहे. त्यामुळे बंडखोर आमदार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाते अजूनही शाबूत असल्याचे दिसत आहे.
स्वगृही परण्याची शक्यता कमीच
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबतच्या कोणाही आमदाराला जबरदस्तीने डांबून ठेवलेले नाही, हे त्यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीच अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचा दाखला देत सांगितले. नितीन देशमुख यांना विशेष विमानाने परत पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे हिंदुत्व, भिन्न विचारसरणीच्या काँग्रेसल्ल्राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करणे आणि उद्धव ठाकरे यांच्याभोवतालची चौकडी ही कारणे देत बंडखोरी करणारे आमदार पुन्हा स्वगफही परतण्याची शक्यता कमीच आहे.
विधानसभा अध्यक्षही दिल्लीत
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत आहेत आणि त्यांनी पंतप्रधान, गफहमंत्री यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा दिल्लीत आहेत. त्यांनी काल अमित शाहांची भेट घेतली आहे. राहुल नार्वेकर कायदेतज्ञ आहेतच, शिवाय महाराष्ट्रातल्या घडामोडींविषयी कायदेशीर प्रक्रिया काय आहे याबाबतही ते कायदातज्ञांची भेट घेत आहेत.