Tarun Bharat

मुंबई सिटी एफसी संघाचे सराव शिबिर दुबईत

Advertisements

वृत्तसंस्था/ मुंबई

आगामी इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामासाठी मुंबई सिटी एफसी संघाकरिता सरावाचे †िशबिर दुबईमध्ये आयोजित केले असून हा संघ लवकरच दुबईला प्रयाण करणार आहे.

मुंबई सिटी एफसी संघासाठी दुबईतील जेबिल अली या शहरामध्ये 25 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान 19 दिवसांचे प्रशिक्षण सराव शिबिर आयोजित केले आहे. 2021-22 च्या इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामात मुंबई सिटी एफसी संघाची कामगिरी अधिक दर्जेदार होण्याच्या दृष्टीकोनातून या संघाच्या प्रँचायझीनी हा निर्णय घेतला आहे. मुंबई सिटी एफसी संघाने एफसी चॅम्पियन्स क्लब लिग स्पर्धेत सामना जिंकून नवा इतिहास नोंदविला आहे. 16 ऑगस्टपासून सुरू होणाऱया 131 व्या डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेत मुंबई सिटी एफसी संघ सहभागी होणार असून या स्पर्धेकरिता हे सराव शिबिर अधिक महत्त्वाचे ठरेल.

आशिया खंडातील डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धा ही सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. 16 ऑगस्टपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत मुंबई सिटी एफसी संघाचा ब गटात समावेश करण्यात आला असून यामध्ये एटीके – मोहन बागान, ईस्ट बंगाल, भारतीय नौदल आणि राजस्थान युनायटेड या संघांचा समावेश आहे. आगामी फुटबॉल हंगामात मुंबई सिटी एफसी संघ दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास या संघाचे प्रमुख प्रशिक्षक बंकिमहॅम यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

राष्ट्रीय सांघिक टेटे ः गुजरात, प.बंगाल यांना सुवर्ण

Patil_p

भारताविरुद्धची फायनल रोमांचक असेल

Patil_p

लंकेचे विंडीजला 375 धावांचे आव्हान

Amit Kulkarni

यजुवेंद्रसाठी ती थेट दुबईत!

Patil_p

केकेआरची हैदराबादविरुद्ध विजयी ‘राईड’!

Patil_p

आयपीएलही 3 मेपर्यंत लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!