Uddhav Thackeray vs Eknath Shinde : उध्दव ठाकरे यांच्या समर्थनाथ निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या शिवसैनिकांची चौकशी मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू झाली आहे. आज सकाळी कोल्हापुरात शिवसैनिकांची चौकशी केल्यानंतर हातकणंगले पोलीस ठाण्यात पाच ते सहा शिवसैनिकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेली प्रतिज्ञापत्र खरे की खोटी याची सत्यता पडताळण्यासाठी तपास सुरू असून,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणेसह शिवसैनिक हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाले.या चौकशीत नेमकी कोणती माहिती पुढे येते याची चर्चा सध्या सर्वसामान्यातून सुरु आहे.
उध्दव ठाकरे यांच्या समर्थनाथ ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली साडे चार हजार शपथपत्र बोगस असल्य़ाचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. यानंतर पोलीस यंत्रणेने तपास सुरु केला आहे. मुंबई गुन्हे शाखेची चार पथक मुंबई, पालघर,अहमदनगर आणि नाशिकमध्ये पोहचली आहेत. कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात तपास करून पुढील तपासासठी हातकणंगले पोलीस ठाण्यात ही टीम दाखल झाली आहे.


previous post