ऑनलाईन टीम /मुंबई
राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आमदार एकनाथ खडसे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील सत्ताबदलानंतर प्रथमच राष्ट्रवादीच्या नेत्याने राज्यपालांची भेट घेतली आहे. आमदार एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या भेटीने राजकिय वर्तृळात चर्चेला उधाण आले आहे.


काही दिवसापुर्वीच एकनाथ खडसे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर आरोप कले होते. “भाजपचे नेते राज्यपालांना भेटल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी बहुमताचा प्रस्ताव आणण्यासाठी राज्यपालांनी अधिवेशन बोलावले. हीच तत्परता राज्यपाल नियुक्त 12 आमदरांच्या नियुक्तीच्या वेळी का दाखवली नाही? ऱोज्यपालांनी ही तत्परता दाखवली असती तर राज्यपलांविषयी आदर आणखी वाढला असता.”