Govind Pansare Murder Case : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाकडे (ATS) द्या असा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. काल (ता. 2 ऑगस्ट) रोजी पानसरे कुटुंबीयांनी त्याबाबत असमाधान व्यक्त केले होते. तसेच तपास एटीएसकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. यावर न्यायालयाने आज सुनावणी करत तपास एटीएसकडे देण्यास सांगितले.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला जवळपास ७ वर्ष उलटून गेली तरीही अजून हत्या करणाऱ्यांचा शोध लागला नाही. महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) या प्रकरणाचा तपास केला जात असून पानसरे कुटुंबीयांनी त्याबाबत असमाधान व्यक्त केले होते. तसेच तपास एटीएसकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली.
हेही वाचा- Sambhaji Raje: 9 ऑगस्टला तुळजापूरातून होणार महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात;संभाजीराजेंची घोषणा
न्यायालयाने पानसरे कुटुंबीयांच्या मागणीची यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान दखल घेऊन पानसरे यांची हत्या करणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यात विशेष तपास पथक अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याच्या पानसरे कुटुंबीयांच्या मागणीवर राज्य सरकारला काही तरी निर्णय घ्यावाच लागेल, असे सरकारला सुनावले होते. त्याचबरोबर पानसरे कुटुंबीयांच्या मागणीवरील निर्णयाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान आज एटीएसकडे तपास देण्याचा आदेश कोर्टाने दिला.

