Tarun Bharat

मेट्रो-३ ला कोणीही थांबवू शकत नाही- देवेंद्र फडणवीस

Mumbai Metro 3 Trial Run : मेट्रो-३ ही मुंबईची नवीन लाईफलाईन आहे. मुंबईकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. वाद-विवाद झाले नसते तर मार्चमध्ये हा प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होऊ शकला असता. कारशेडच्या वादामुळे प्रकल्पाला वेळ लागला. हा वाद पर्यावरणापेक्षा राजकिय अधिक झाला आहे. शिंदेंनी निर्णय घेतला नसता तर ४ वर्षे मेट्रो खोळंबली असती. असे शिंदेंचे कौतुक करत फडणवीसांनी उध्दव ठाकरेंना टोला लगावला.कुलाबा-वांद्रे-सिप्झ मुंबई मेट्रो ३ आरे- सारीपूतनगर ते मरोळ नाका ट्रकवर आज चाचणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला. मेट्रोला कुणी थांबवू शकत नाही असा सिग्नल देत इशाराही दिला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने या प्रकल्पाला परवानगी दिली आहे. सर्वप्रकारच्या पर्यावरणाचा सार्वंगिक अभ्यास करून कोर्टाने परवानगी दिली. पर्यावरणपूरक प्रकल्प असल्याचा हरित लवादाचा निर्णय आहे. यामध्ये १७ लाख लोक या मेट्रोने प्रवास करतील. तर ७ लाख गाड्या रस्त्यावरून कमी होतील. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो महत्त्वाची आहे. प्रदुषणामुळे मुंबईकर रोज थोडे-थोडे मरत आहेत आणि आपण राजकारण करत आहोत यापेक्षा मोठं दुर्देव आणखी काय असू शकत असा टोला फडणवीसांनी उध्दव ठाकरेंना लगावला.

कांजूर कारशे़मध्ये पैसे, वेळ वाया गेला असता. कारशेड हा इगोचा विषय नाही. कांजूरमधील कारशेड अव्यवहार्य आहे. असा हल्लाबोल त्यांनी केला. एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी निर्णय घेतल्यानं हे शक्य झालं अस म्हणत शिंदेंचं आभार मानले. तर अश्विनी भिडे यांच्या चमूचंही कौतुक केलं. यावेळी जपान सरकारचेही त्यांनी आभार मानले.

Related Stories

संभाजीराजेंची राजकीय ‘वाट’‘चाल’ 12 तारखेला ठरणार!

Abhijeet Khandekar

जिल्हयात 23 ठिकाणी अवैध दारु विक्रीवर कारवाई

Patil_p

मध्यप्रदेशात ‘गो कॅबिनेट’साठी झाली पहिली बैठक

datta jadhav

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर लता मंगेशकरांची भावनिक पोस्ट ; रक्षाबंधनचा फोटो शेअर करत म्हणाल्या….

Archana Banage

उत्तराखंडात टोळधाडीची शक्यता; हाय अलर्ट जारी

Tousif Mujawar

यूपी : 9 रेल्वे स्टेशनसह धार्मिक स्थळांवर बॉम्ब हल्ल्याची धमकी

datta jadhav