Tarun Bharat

मुकेश अंबानी रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदावरून पायउतार; आकाश अंबानी यांच्यकडे धुरा

Advertisements

ऑनलाईन टिम / मुंबई

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याची मंगळवारी रिलायन्स जिओच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समूहाची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला असून कंपनीची धुरा मुकेश यांचा मोठा मुलगा आकाश याच्याकडे सोपवली आहे.

आकाश अंबानी अगोदर रिलायन्स जिओच्या इन्फोकॉम लिमिटेडमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर या पदावर कार्यरत होते. मुकेश अंबानी यांनी राजीनामा दिल्यावर दुसऱ्याच दिवशी आकाश अंबानी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मुकेश अंबानी रिलायन्स जिओ इन्फोकॉमसह सर्व जिओ डिजिटल सेवा ब्रँडची मालकी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचे अध्यक्ष राहतील.

कार्यकारी मंडळाच्या इतर नियुक्त्यांमध्ये, पंकज मोहन पवार यांची कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी 5 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली. तर रामिंदर सिंग गुजराल आणि केव्ही चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुकेश अंबऩी यांनी गेल्याच वर्षी सूचित केले होते की, त्यांच्या मुलांवर आता अधिक जबाबदाऱ्या पडणार आहेत. आज पहील्यांदाच मुकेश अंबानी मंडळाच्या मिटींगमध्ये मागे बसले होते.

Related Stories

केंद्राच्या माध्यमातून करु कोल्हापूर शहराचा विकास : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

Sumit Tambekar

अपघातात मरण पावलेल्याच्या कुटुंबीयांना परिहार निधी सुपूर्द

Patil_p

बंगळूरमध्ये कोरोना संक्रमणाची संख्या दुप्पट; लॉकडाऊनचा प्रश्नच नाही : मुख्यमंत्री येडियुरप्पा

Abhijeet Shinde

कळंब्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Sumit Tambekar

कोळंबी पैदास केंद्राच्या ठिकाणी फिशिंग ऍक्टिव्हिटी व्हिलेज उभारा

Omkar B

सातारा : कोरोनाच्या सावटाखाली बेंदूर साधेपणाने साजरा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!