Tarun Bharat

राज्यातील भाजप नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील भाजपचे नेत्यांची दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासोबत बैठक होणार आहे. १९ व २० मे रोजी भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीला राज्यातील भाजपचे नेते उपस्थिती लावणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, राज्यसभा निवडणूक आदी विषयवार या बैठकीत चर्चा होऊ शकते. असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

ही बैठक १९ ते २० मे रोजी होणार असून साधारणपणे या बैठकी राज्यातील बिघडलेल्या राजकीय परिस्थिती, माजी खासदार संभाजीराजे यांना महाविकास आघाडीने दिलेला पाठिंबा या विषयावर चर्चा होऊ शकते. दरम्यान, या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देखील या बैठकीला आमंत्रण दिल्याने राज्यातील परिस्थितीवर चर्चा होऊ शकते.

यासोबतच राज्यातील महानगरपालिका,जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडी पाहता येणाऱ्या काळात भाजपची रणनीती काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Related Stories

सलग दुसऱ्या दिवशी अडीच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

datta jadhav

राज्यातील ग्रामीण भागात ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंड बांधकामास परवानगीची गरज नाही

Archana Banage

पंजाब दारूबळींचा आकडा 86 वर

Patil_p

उत्तरप्रदेशातील ‘राजकारणा’त दरवळणार सुगंध

Patil_p

कारिवडे धरणात मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Anuja Kudatarkar

चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला…

datta jadhav