Tarun Bharat

राऊत चवन्नी छाप, तर ठाकरे महिलेला घाबरले: रवी राणा

मुंबई:खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका महिलेला घाबरले, म्हणून त्यांनी नवनीत आणि माझ्यावर कारवाई केली. तर न्यायालयाच्या निकालावर संजय राऊत यांनी आक्षेप घेतला. त्यावरून संजय राऊत हे तर चवन्नी छाप आहेत. राऊतांना हा अधिकार कोणी दिला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आम्हाला जामीन देणार असं सांगून पोलिसांनी आम्हाला पोलीस ठाण्यात नेलं. तिथे त्यांनी आम्हाला चहा दिला. रात्री १२ नंतर सांताक्रुझ जेलमध्ये आम्हाला टाकलं. त्याठिकाणी पाणी दिलं नाही, बाधरूम वापरू दिलं नाही, पंखा सुद्धा नाही, चटई सुद्धा दिली नाही. आम्ही ५ वाजेपर्यंत चटई आणि पंखा, पाण्यासाठी मागणी करत होतो. एका महिलेचा इतका छळ करणे, उद्धव ठाकरे सरकार एका महिलेला घाबरले आहेत. त्यामुळे सक्तीची कारवाई आमच्यावर केली. असा आरोप रवी राणा यांनी केला.

“हनुमानाचं नाव घेतल्याने राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर महाराष्ट्राचं हे दुर्दैवं आहे. १४ आम्हाला जेलमध्ये ठेवणाऱ्या या मुख्यमंत्र्यांचा अहंकार मोडला जाईल. जे रावणाचं झालं तेच मुख्यमंत्र्यांचं होणार आहे. हनुमान आणि रामभक्त उद्धव ठाकरेंची लंका खाक करतील”, असा इशाराही रवी राणा यांनी दिला.”न्यायालयाच्या निर्णयावरही संजय राऊतांनी आक्षेप घेतला. संजय राऊत हे चवन्नी छाप आहेत. संजय राऊतांना हा अधिकार कोणी दिलाय, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे”.

“दोन लहान मुलं आणि वृद्ध आई-वडील घरात होते. शिवसेना कार्यकर्ते घरावर दगडफेक करत होते. त्यांच्यावर कुठलाही कारवाई झाली नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईलवर कारवाई करायला हवी. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर कारवाई झालीच पाहिजे. भ्रष्टाचाऱ्यांवर कारावई करावी. दिल्लीला जाऊन आम्ही ही मागणी करणार”, असं रवी राणा म्हणाले.

Related Stories

सोलापूर जिल्ह्यातील मंगल कार्यालयांत लग्न समारंभास परवानगी

Archana Banage

ठाकरे सरकारकडून लवकरच साडे बारा हजार पोलिसांची भरती

Tousif Mujawar

पुणे : भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी नाही : अनिल घनवट

datta jadhav

आसाममध्ये भाजपला धक्का; BPF ने सोडली साथ

datta jadhav

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 10,441 नवे कोरोना रुग्ण; 258 मृत्यू

Tousif Mujawar

भारताने 14 हजार फूट उंचीवर तैनात केले सहा टी-90 रणगाडे

datta jadhav