मुंबई- राज्यसभेच्या निवडणूकीच्या तोंडावरच विधानपरिषदेच्या निवडणूकीचा बिगूल वाजल्याने राज्यात वेगवान राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. भाजपकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी अनेक दिग्गज इच्छूकांची चुरस सुरू आहे. त्यामुळे वेगळीच रंगत पहायला मिळत आहे. भाजप आपल्या उमेदवारांची यादी आज जाहीर करणार असून इच्छुकांमधून चित्रा वाघ, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या चौघांची नवे चर्चेत आहेत. मात्र भाजप कोणाला संधी देणार हे थोड्याच वेळात पहायला मिळेल.
विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या १० जागांसाठी २० जून २०२२ रोजी मतदान होणार आहे. भाजपचे विधानपरिषदेचे प्रतिनिधीत्व करणारे प्रसाद लाड, प्रविण दरेकर, सुजितसिंग ठाकूर यांच्यासह सदाभाऊ खोत, विनायक मेटे या आमदारांची मुदत संपत आहे. तर सत्यनारायण सिंह यांचे यापुर्वीच निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे.
इच्छूक उमेदवारांपैकी प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड हे आघाडीवर असल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे. तर भाजपची महिला आघाडी संभाळणाऱ्या चित्रा वाघ आणि पंकजा मुंडे यांचे ही नाव चर्चिले जात आहे. सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांची नावे मागे पडल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक उमेदवाराला विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी २७ मतांची आवश्यकता असून मित्रपक्षांसह भाजपकडे ११३ च्या मतांचा आकडा आहे. त्यामुळे भाजपचे ४ उमेदवारांर विधानपरिदेवर जाणे हे जवळजवळ निश्चित आहे.
भाजपकडून विधान परिषदेवर वाघ, मुंडे, दरेकर, लाड यांना संधी?
Advertisements