Tarun Bharat

मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; एक हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातच्या (gujarat) भरुचमध्ये धडक कारवाई केली आहे. यावेळी मारलेल्या छाप्यात तब्बल एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज (Drugs)जप्त केले आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. (Mumbai police busts mephedrone unit in Gujarat; drugs worth Rs 1,026 crore seized)

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमध्ये भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आणला आहे. यावेळी मारलेल्या छाप्यात मुंबई पोलिसांनी जवळपास ५१३ किलोचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या अंमली पदार्थाची किंमत १०२६ कोटी रुपये आहे. यावेळी पोलिसांनी एका महिलेसह सात जणांना अटक केली आहे. 

हे ही वाचा : चेन्नई विमानतळावर १०० कोटीचे ड्रग्ज जप्त

मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी विभागाने गेल्या १५ दिवसांत केलेली ही मोठी कारवाई आहे. याआधी पोलिसांनी नालासोपाऱ्यात छापा टाकला होता. या कारवाईत ७०३ किलो वजानाचे एमडी जप्त करण्यात आले. व त्याची किंमत सुमारे १४०० कोटी रुपये होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.

Related Stories

52 सहकाऱ्यांसह योगी आदित्यनाथ शपथबद्ध

Patil_p

निर्भया : आरोपी पवन अल्पवयीन असल्याची याचिका कोर्टाने फेटाळली

prashant_c

८४ टक्के शालेय शिक्षकांनी घेतला लसीचा एक डोस: शिक्षण विभाग

Abhijeet Shinde

उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

Patil_p

पंतप्रधानांची आढावा बैठक सुरु ; मोठ्या निर्णयांची शक्यता

Abhijeet Shinde

योगींच्या कार्यक्रमात रिव्हॉल्व्हर घेऊन पोहचला व्यक्ती…

datta jadhav
error: Content is protected !!