Tarun Bharat

जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख आणि मलिक यांच्या मतदानावर प्रश्नचिन्ह

Advertisements

ऑनलाईन टिम / मुंबई

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil_Deshmukh) आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक ( Nawab_Malik ) यांना मतदानासाठी एका दिवसाचा जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. पण ईडीने 1951 कलम 62(5) या कायद्याचा हवाला देत या जामीनाला विरोध केला. त्यामुळे न्यायालय़ाने एक दिवसाचा जामिन नाकारला.

महाराष्ट्रात सध्या राज्यसभेच्या निवडणूकीच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत आपल्या मतांची बेगमी करण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी धडपड करत असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टिची दोन हक्काची मते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे सध्या कोठडीत आहेत. आ. अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदाना दिवशी एक दिवसाचा जामीन मिळावा यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता.


या एक दिवसाच्या जामीनाला सक्तवसूली संचालनालय (ED) ने विरोध केला. ईडीने 1951 कलम 62 (5) या कायदृयाचा आधार घेत एखादा ‘व्यक्ती तुरुंगामध्ये असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही’. ईडीचा हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून देशमुख आणि मलिक यांचा जामिन अर्ज फेटाळला. पीएमएलए न्यायालयाच्या या निर्णयाविरूद्ध आ. देशमिख आणि मंत्री नवाब मलिक उच्च न्यायालयात अर्ज करणार आहेत.

Related Stories

कोल्हापूर : पाणंद रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यात ; ऊस वाहतुकीसाठी शेतकऱ्यांची दमछाक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हेरले येथील धोकादायक पुलाच्या कठड्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

Abhijeet Shinde

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी ओलांडला 40 लाखाचा टप्पा

datta jadhav

आर्थिक फसवणूक झाल्याच्या निराशेने गळफास घेत आत्महत्या

Abhijeet Shinde

म्हेतर समाजाला विधीमंडळात प्रतिनिधीत्व मिळावे

Abhijeet Shinde

सातारा आणि कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात पाच दिवस अतिमुसळधार पाऊस

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!