तरुण भारत

मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

ऑनलाईन टीम / पुणे :

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंध आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना विशेष पीएमएलए न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळाला आहे. मलिकांना वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला नसला तरी, खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांच्यावर आता कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत.

Advertisements

मलिकांना किडनीचा त्रास आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुरुंगात असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. किडनीशी संबंधित शस्त्रक्रियेसाठी त्यांनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. अखेर त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळे हा निर्णय मलिक यांच्यासाठी दिलासा मानला जात आहे. मलिकांवर आता कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत. तसेच त्यावेळी लागणाऱया पोलीस बंदोबस्तासाठीचा खर्च मलिकांना करावा लागणार आहे. मलिक यांच्यासोबत कुटुंबातील एकाच सदस्याला राहण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. तेव्हापासून मलिक तुरूंगात आहेत.

Related Stories

मार्च महिन्यातील भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्यास मुदतवाढ – खासदार संजय मंडलिक

Abhijeet Shinde

कर्नाटकात गेल्या २४ तासात १,०६५ नवीन रुग्ण, तर २८ मृत्यू

Abhijeet Shinde

खा. उदयनराजे भोसले यांचा भाजपकडून अवमानच – आ. शशिकांत शिंदे

Patil_p

पालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी : वंचित बहुजन आघाडीची मागणी

Abhijeet Shinde

“कोण राहुल गांधी ? मी ओळखत नाही”; असदुद्दीन ओवेसींचा काँग्रेसवर निशाणा

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात पुन्हा नाईट कर्फ्यू ?

Sumit Tambekar
error: Content is protected !!