निवडणुक आयोगाने निवडणुक चिन्ह आणि पक्षाचे नाव यांचा निकाल देण्यापुर्वी सदस्यांच्या अपात्रतेच्या संबंधी निर्णय द्यावा असे अशी विनंती आम्ही आयोगाकडे केली असल्याची माहीती शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली आहे. मी दुसरी शिवसेना मानत नसून शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होणार असल्याचेही ते म्हणाले.
मुंबईत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “निवडणुक आयोगासमोर आम्ही जेजे मांडले आहे त्याचा घटनात्मक सत्याता आम्ही तपासली आहे. त्यामुळे आम्ही निवडणुक आयोगाला पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव यांचा निकाल देण्यापुर्वी सदस्य अपात्रतेचा निर्णय अगोदर व्हावा. कराण आम्हाला शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची खात्री आहे.”
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विचलीत न होण्यासाठी आपली भुमिका मांडत असल्याचे सांगून ते म्हणाले, “शिवसेना एकच आहे, मी दुसरी शिवसेना मानत नाही. पैशाच्या जोरावर राजकारण करणे हे लोकशाहीसाठी घातक असून उद्या कोणीही उठून पैशाच्या आधारे सदस्य विकत घेउन स्वताला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान करवून घेईल.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आमचे मुद्दे तोंडी आणि लेखी अशा दोन्ही प्रकारे आम्ही निवडणुक आयोगासमोर मांडले आहे. शिवसेनेने स्वताची घटना केली आहे आणि त्यानुसारच त्याचा कारभार चालतो. शिवसेना प्रमुख हे पद बाळासाहेबांनाच शोभत होते. त्यामुळे त्यांच्यानंतर हे पद आम्ही गोठवून शिवसेना अध्यक्ष हे नविन पद चालु केले. पण त्यावर ही आक्षेप घेतला गेला. पण शिवसेना पक्षात गटनेता हे पदाचा उल्लेखही नाही.”तसेच निवडून आलेले नेते हाच पक्ष असे मानणाऱ्या शिंदे गटाची मागणी ही हास्यास्पद असल्याचे सांगून आपल्या शपथपत्रांपर ही आक्षेप घेतला गेल्याचे ते म्हणाले.