Tarun Bharat

पदार्पणात द्विशतक ठोकणारा मुंबईचा सुवेद पारकर ठरला दुसरा भारतीय

Advertisements

ऑनलाईन टिम मुंबई

मुंबईच्या 21 वर्षीय सुवेद पारकरने आज मंगळवारी रोजी बेंगळूरमधील अलूर येथे उत्तराखंडविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यात द्विशतक ठोकले. सुवेधच्या या कामगिरीमुळे तो प्रथम श्रेणीतील क्रिकेट सामन्यात पदार्पणातच द्विशतक करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. यापुर्वी अशी कामगिरी माजी रणजीपटू अमोल मुझुमदार यांनी केला होता.

सुवेद पारकर यांना रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी प्रशिक्षण दिले आहे. रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या दिवशी जबरदस्त खेळी करून 200 धावांचा टप्पा पार केला. या सामन्यात मुंबईने उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यावर नियंत्रण मिळवत 600 धावांचा डोंगर उभा केला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सुवेद पारकरने सर्फराज खानसोबत २७७ धावांची भागीदारी रचली, सर्फराज खानने १५३ धावांची खेळी केली.

दरम्यान, भारतातील प्रथम श्रेणी स्पर्धेच्या बाद फेरीत पदार्पणात द्विशतक ठोकणारा पारकर हा एकमेव दुसरा फलंदाज आहे. 1993-94 च्या मोसमात फरिदाबाद येथे हरियाणा विरुद्ध मुंबईसाठी खेळून 260 धावा करणारा अमोल मुझुमदार हा एकमेव खेळाडू होता.

प्रथम श्रेणी पदार्पणात द्विशतक ठोकणारा पारकर हा केवळ 12वा भारतीय फलंदाज ठरला. उल्लेखनीय म्हणजे, या वर्षाच्या सुरुवातीला कोलकाता येथे मिझोरामविरुद्ध 341 धावा ठोकताना प्रथम श्रेणी पदार्पणात त्रिशतक झळकावणारा एकमेव भारतीय फलंदाज म्हणून बिहारच्या साकीबुल गनीच्या नावावर आहे.

Related Stories

भारतात समूह संसर्गाला सुरुवात : IMA

datta jadhav

इस्रायलमध्ये चेंगराचेंगरीत 44 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Patil_p

कुशवाह-नितीशकुमार आठ वर्षांनंतर एकत्र

Patil_p

सांगली : राजू शेट्टी यांचे दूध आंदोलन म्हणजे मॅचफिक्सिंग

Abhijeet Shinde

कणेरी मठ येथे भरते बोलक्या विद्यार्थ्यांची बोलकी शाळा

Abhijeet Shinde

सुगंधी तंबाखू साठाप्रकरणी शिरोळ उपनगराध्यक्ष मानेवर पोलिस कारवाई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!