Tarun Bharat

‘धर्मवीर-मुक्काम पोष्ट ठाणे’ चित्रपटाने केली इतकी कमाई

Advertisements

ऑनलाईन टिम : प्रतिनिधी

धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे या मराठी चित्रपटाचे बजेट जेमतेम ८ कोटी असून सुध्दा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. ६ व्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जवळपास १ कोटी ५० लाखांची कमाई केली होती. ७ व्या दिवशी या चित्रपटाने जवळपास १ कोटी ८५ लाखांची कमाई केली असून ७ व्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये २०% वाढ झाली आहे.

धर्मवीर हा चित्रपट ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणेसह मुंबईमध्ये जोरदार व्यवसाय करत आहे. १३ मे २०२२ रोजी मराठी भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जिवनावर आधारित आहे अभिनेता प्रसाद ओक यांनी या चित्रपटात आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारली असून चित्रपटाची पटकथा प्रवीण तरडे यांनी लिहिली आहे. ४०० हुन अधिक चित्रपटगृहे आणि १० हजाराहून अधिक खेळांसह हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Related Stories

सातारा : कोडोलीत मायक्रो कटेंन्मेंट झोन

Abhijeet Shinde

शिरोळ येथे ट्रॅक्टर वरून पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Abhijeet Shinde

सातारा: कारागृहातील एक निकट सहवासित कोरोना बाधित

Abhijeet Shinde

शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, उगाचं फुकटचं श्रेय घेऊ नका…;राज ठाकरे

Abhijeet Khandekar

वर्षा राऊत यांची ईडीकडून ९ तास चौकशी

Abhijeet Shinde

येसाबाई कांबळे यांचे 103 व्या वर्षी निधन

Sumit Tambekar
error: Content is protected !!