Tarun Bharat

भुशी धरणात मुंबईचा पर्यटक बुडाला, शोध सुरू

लोणावळा : लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक लोणावळ्यातील भुशी धरणात बुडाल्याची घटना आज दुपारी घडली. धरणात बुडालेला पर्यटक मुंबईचा असून, स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे.

साहिल सरोज (वय-19, रा. मुंबई) असे या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार साहिल आणि त्यांच्या ग्रुपचे 250 पेक्षा अधिक सहकारी पाच बसेसने लोणावळा व खंडाळ्यात वर्षाविहार व पर्यटनासाठी आले होते. दुपारी सर्व सहकारी हे भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याकडे भिजण्यासाठी गेले होते. यावेळी धबधब्याच्या मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून येताना साहिलचे पाण्यात नियंत्रण सुटल्याने तो वाहत जाऊन पुढे काही अंतरावर भुशी धरणाच्या मागील बाजुला असलेल्या धबधब्यावरून सुमारे २५ ते ३० फुट उंचीवरून खाली वाहत जाऊन भुशी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडाला आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करत स्थानिकांच्या मदतीने साहिलचा शोध सुरु केला आहे. तसेच शोध कार्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. अद्याप शोध मोहीम सुरू आहे.

हेही वाचा : ‘आरटीई’साठी उद्यापर्यंत मुदतवाढ

Related Stories

समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल यांची आत्महत्या

Tousif Mujawar

भोसरेत वार्षिक दिपोत्सव व शिवप्रताप दिन साजरा

Patil_p

विनापरवानगी पाणी प्यायल्याने केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

राष्ट्रपती राजवटीची सर्व कारणे राज्य सरकारने पुर्ण केली – चंद्रकांत पाटील

Abhijeet Khandekar

नांदणीतील ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील दोन नातेवाईक पॉझिटिव्ह

Archana Banage

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी फळबाग लागवड आवश्यक : मंत्री पाटील

Archana Banage