Tarun Bharat

अलारवाडनजीक अपघातात मुंबईचा ट्रकचालक जागीच ठार

प्रतिनिधी /बेळगाव

डिझेल संपल्याने रस्त्याशेजारी ट्रक उभी करताना भरधाव आयशरची धडक बसून ट्रकचालकाचा मृत्यू झाला. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अलारवाड पुलाजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

गुलाम (वय 30) रा. मुंबई असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुर्दैवी चालकाचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मुंबई येथील गुलामच्या कुटुंबीयांना यासंबंधीची माहिती देण्यात आली
आहे.

कोल्हापूरहून बेंगळूरकडे जाणाऱया ट्रकमधील डिझेल संपले. या ट्रकवर दोन चालक कार्यरत होते. एकटा आपली ट्रक सर्व्हिस रोडवर घेत होता. तर गुलाम खाली उभा राहून दिशादर्शन करीत होता. त्याचवेळी भरधाव जाणाऱया आयशरची धडक बसून गुलाम जागीच ठार झाला. अपघातानंतर आयशर चालकाने वाहन जागेवरच सोडून पलायन केले आहे.

अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. गुलामसोबत आलेल्या चालकाला त्याच्याविषयी अधिक माहिती नाही. केवळ पुसटशी माहिती आहे. त्याचे कुटुंबीय बेळगावला दाखल झाल्यानंतरच अधिक माहिती समजणार आहे. या युवकाचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला आहे.

Related Stories

नरेगा योजनेतील कामे त्वरित सुरू करा

Amit Kulkarni

जिल्हय़ात बुधवारी केवळ 1 रुग्ण

Amit Kulkarni

बेनकनहळ्ळीतील नूतन सदस्यांचा ब्रम्हलिंग सोसायटीतर्फे सत्कार

Patil_p

व्हीटीयूला आयआयटीचा दर्जा देणार

Patil_p

छत्रपती शिवरायांचा आम्हाला सार्थ अभिमान

Omkar B

सेवा बजावताना निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्या

Amit Kulkarni