Tarun Bharat

मडगाव स्टेशन रोडवरील नाल्याची पालिकेकडून सफाई

Advertisements

कोकण रेल्वेच्या हद्दीतील नाल्याची ताबडतोब सफाई करण्याचे मुख्याधिकाऱयांकडून निर्देश

प्रतिनिधी /मडगाव

मडगावातील स्टेशन रोडवरील सनरीट हॉटेलजवळील रस्त्याच्या मधून जाणारा मुख्य नाला मान्सूनपूर्व कामाच्या अंतर्गत मडगाव पालिकेने शुक्रवारी साफ केला. हा नाला पुढे कोकण रेल्वेच्या हद्दीतून जातो. पाणी पुढे अडून राहू नये म्हणून मुख्याधिकारी रोहित कदम यांनी कोकण रेल्वेला सदर नाल्याची ताबडतोब आवश्यक साफसफाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रभाग 14 च्या स्थानिक नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर कवळेकर, मुख्याधिकारी कदम, पालिकेचे साहाय्यक अभियंता विशांत नाईक, कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर या कामाच्या पाहणीवेळी उपस्थित होते.

स्टेशन रोड भागात नेहमीच पावसाळ्यात पूरसदृश स्थिती उद्भवत असते. येथून जाणारा मुख्य नाला तुंबल्यास स्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे आम्ही मान्सूनपूर्व कामांच्या अंतर्गत हा नाला साफ केला असून पुढे हा नाला कोकण रेल्वेच्या हद्दीतून जात असल्याने पालिका कामगार राबवून तेथे काम करू शकत नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱयांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱयांना त्यांच्या हद्दीतील नाल्याची लवकरात लवकर साफसफाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती नगरसेविका डॉ. रोनिता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्य नाला साफ केल्यानंतर स्टेशन रोडवर पाणी साचून राहण्याचे प्रकार कमी होतील, असे त्यांनी सांगितले. हा सखल भाग असल्याने येथे पाणी साचून राहत असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले व पालिकेकडून आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या बाबतीत कोणतीही कसर ठेवली जात नसल्याचे स्पष्ट केले.

Related Stories

आमदार संकल्प आमोणकर यांच्या कार्यकर्त्याकडून आनंदोत्सव

Amit Kulkarni

खाण लीज नूतनीकरण सीबीआयकडे सोपवा

Patil_p

कोविड हॉस्पिटलातील डॉक्टरांची सेवा बंद

Patil_p

कला मंदिरमध्ये स्वरमैफलींची बरसात

Patil_p

चिखली उपजिल्हा इस्पितळाच्या रूग्णवाहिकेचे आरोग्य धोक्यात

Patil_p

दहावी, बारावी प्रथम सत्र परीक्षा 10 नोव्हेंबरपासून

Patil_p
error: Content is protected !!