Tarun Bharat

महापालिकेने मागविला औषधांचा साठा

आरोग्य केंदे बंद असताना मागविलेला औषधसाठा कोणासाठी?

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिकेच्यावतीने वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी शहर आणि उपनगरात रुग्णालये सुरू करण्यात आली होती. मात्र ही रुग्णालये बंद केली आहेत. वैद्यकीय सेवा पुरविली जात नसतानाही मनपाने औषधांचा पुरवठा करण्यासाठी निविदा काढली आहे. त्यामुळे हा औषधांचा पुरवठा कोणासाठी? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

महापालिकेच्यावतीने वैद्यकीय सेवाकर आकारला जातो. वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची होती. त्यामुळे शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी नगर आरोग्य केंद्रांची सुरुवात महापालिकेने केली होती. 15 हून अधिक ठिकाणी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंदे सुरू केली होती. या ठिकाणी विविध औषधोपचार सेवा उपलब्ध करण्यात आली होती. तसेच अनगोळ आणि होसूर, बसवाण गल्ली येथे प्रसूतिगृहाची स्थापना केली होती. या प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे वैद्यकीय सेवा देण्यात येत होती.

मात्र वैद्यकीय अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचारी निवृत्त झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे बंद करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या नियुक्तीस नगरविकास खात्याने परवानगी दिली नाही. परिणामी सर्व आरोग्य केंदे बंद करून आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी आरोग्य खात्याकडे सोपविण्यात आली. त्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य खात्यामार्फत शहर आणि उपनगरात महापालिकेच्या इमारतीमध्ये नगर आरोग्य केंदे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे आता वैद्यकीय सेवा आरोग्य खात्यामार्फत पुरविण्यात येत आहेत. ही सेवा आरोग्य खात्यामार्फत पुरविण्यात येत असताना महापालिकेने मात्र औषधसाठा पुरवठा करण्याची निविदा मागविली आहे. आरोग्य केदांमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱया विविध औषधांचा साठा पुरविण्यासाठी निविदा काढली आहे. आरोग्य केंदे बंद केली असताना औषधांचा साठा मागविण्याची आवश्यकता काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. प्रत्येक नगर आरोग्य केंद्रात आरोग्य खात्याच्यावतीने रुग्णांना गोळय़ा-औषधे पुरविण्यात येत असताना महापालिकेने औषधांचा साठा कोणासाठी मागविला आहे? अशी विचारणा होत आहे.

Related Stories

खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाई थांबवा

Amit Kulkarni

शहरात वाहतूक क्यवस्थेचे तीनतेरा

Patil_p

दक्षिणमुखी मारुतीचीत रुईच्या पानांची पूजा

Patil_p

डोक्यावरून मैला वाहून नेणाऱया कुटुंबांचा सर्व्हे सुरू

Patil_p

खानापूर तालुक्यात गुरुवारी आणखी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Tousif Mujawar

सुळगे (ये.) येथे महिला मेळावा उत्साहात

Amit Kulkarni
error: Content is protected !!